बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती मधील लॉकडाऊनमुळे 400 पर्यंत गेलेला कोरोनाग्रस्तांच्या आकडा आता हळूहळू कमी होऊ लागला आहे, मात्र अजूनही तो 200 ते 300 च्या दरम्यान आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय दररोज होत असलेले कोरोना ग्रस्तांचे मृत्यूदेखील तसेच कायम आहेत. (Baramati, Corona update, rtpcr, antigen test, lockdown)
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार तालुका व शहरातील मिळून आतापर्यंत 512 जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण कमी होण्याची गरज आहे. दरम्यान परवा बारामतीत 277 जण कोरोना बाधित आढळून आले, तर काल 250 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
काल बारामती तालुक्यात 1062 जणांची तपासणी झाली. त्यापैकी 250 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. काल पर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21 हजार 449 एवढी झाली असून, आतापर्यंत 17305 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल जरी 250 जण कोरोना बाधित आढळून आले असले, तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. काल 304 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली, तर परवा 277 जण कोरोनाग्रस्त आढळून आले असले, तरी तब्बल 406 जणांनी कोरोनावर मात केली.











