दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : गरवारे टेक्निकल फायबर कंपनीने दोन व्हेंटिलेटर मँप्रो कोविड सेंटर व घोटवडेकर हाँस्पिटल येथे कोविड रूग्णांच्या सेवेत दाखल केले. मँप्रो सेंटर येथे प्रांताधिकारी संगिता चौगुले राजपुरकर व तहसिलदार रणजित भोसले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यावेळी वैभव जाेशी व नंदकुमार जाधव उपस्थित हाेते. या अगोदर सुध्दा गरवारे कंपनीने सातारा सिव्हिलला ३ व्हेंटिलेटर, मँप्रो सेंटरला आँक्सिजन पाईपलाईन सेटअप दिला आहे. मँप्रो कोविड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी कंपनीने सांगितल्याप्रमाणे वरील हॉस्पिटलला दोन व्हेंटिलेटर दिले, ते आज सुरू करण्यात आले आहेत, तर उर्वरित तीन व्हेंटिलेटर सुध्दा लवकरच सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.
कंपनीचे चेअरमन वायू गरवारे यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीने नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आरोग्य व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केलेले आहे . समाजोपयोगी कामात गरवारे कंपनी नेहमी अग्रेसर असते. कोरोनाच्या या काळात तालुक्यातिल रुग्नांचे व्हेंटिलेटर अभावी हाल होत होते. कित्येक रुग्णांना व्हेंटिलेटरअभावी प्राण गमवावे लागले आहेत. याची जाणिव ठेवून कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे अध्यक्ष वायु गरवारे व व्यवस्थापनाचे आज शासकीय अधिकाऱ्यांनी कौतुक केले.











