दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्याती लिंगाळी येथे रविवारी ( दि.9 ) ऊसाच्या शेतात एक होंडा कंपनीची दुचाकी संशयास्पद आणि बेवारस आवस्थेत गोपाळवाडी येथील ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना आढळून आली. ही दुचाकी या कार्यकर्त्यांनी त्वरीत दौंड पोलीसांना संपर्क साधून त्यांच्या ताब्यात दिली.
मागील काही दिवसापासून लिंगाळी हद्दीतील एका उसाच्या शेतात एक दुचाकी बेवारस अवस्थेत पडून असल्याची माहिती ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. गोपाळवाडी ग्राम सुरक्षा दलाचे अभिषेक सुळ, सुरज होले, शंभूदेव गवळी, ऋषिकेश होले यांनी रविवारी रात्री 11 दरम्यान घटनास्थळी भेट दिली.
या ठिकाणी उसाच्या शेतात ही गाडी बेवारस आणि संशायस्पदरित्या सोडून दिल्याची आढळुन आली. या कार्यकर्त्यांनी तात्काळ दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस अभिजित गिरमे यांच्यांशी संपर्क
साधत याबाबत माहिती दिली. दौंड पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस अधिकारी मयूर भुजबळ, पोलीस कर्मचारी भरत जाधव यांच्या ताब्यात ही दुचाकी देण्यात आली. या दुचाकी बाबत कोणाला माहिती मिळाल्यास दौंड पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन दौंड पोलीसांनी केले आहे.











