महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचा मृत्यू झालेला नसून, अजून त्याच्यावर उपचार सुरू आहेत असे स्पष्टीकरण एम्सच्या वतीने देण्यात आले.
छोटा राजन यास 27 एप्रिल रोजी एम्समध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या छोटा राजन यांची प्रकृती अत्यवस्थ असली तरी अजून त्याच्यावर उपचार सुरू आहेत असे एम्सच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दरम्यान या संदर्भात देशभरातील प्रसारमाध्यमांनी छोटा राजनच्या मृत्यूची माहिती प्रसिद्ध केली होती परंतु एएनआयने नुकतेच छोट्या राजनची प्रकृती अत्यवस्थ असली तरी अजून उपचार सुरू आहेत असे स्पष्ट केले.











