सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दहशत कायम ठेवली असून दररोज 250 पेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. फक्त पाच दिवसात पहिल्यांदाच तीनशेहून अधिक असणारे रुग्ण संख्या आता तीनशेच्या खाली आली आहे, परंतु कोरोनि रुग्णांचे वाढलेले मृत्यू मात्र धक्कादायक आहेत.
30 एप्रिल रोजी इंदापूर तालुक्यात 9 जण मृत्युमुखी पावले असून, आज देखील (ता.1 ) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अवघ्या दोन दिवसात सतरा जणांनी आपला कायमचा निरोप घेतला आहे. प्रशासनाने आता गावोगावी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटर उभा करण्यास परवानगी दिली असून, आज बोरी आणि सणसर येथे नव्याने इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन सेंटर सुरू झाली आहेत. बोरी येथे वीस बेडचे तर सणसर येथे आठ खोल्यांचे सेंटर सुरू झाले आहे.
सातत्याने वाढत चाललेल्या या रुग्ण संख्येमुळे इंदापूर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या 15 हजाराकडे वाटचाल करत असून, आज पर्यंत 13 हजार 376 जणांना कोरोना ची लागण झाली आहे. सध्या इंदापूर तालुक्यात 2803 ॲक्टिव्ह रुग्ण कोरोनाग्रस्त असून उपचार घेत आहेत. तर आज अखेर इंदापूर तालुक्यात 66 हजार जणांची कोरोनाची तपासणी झाली आहे. आज एका दिवसात इंदापूर तालुक्यातून 244 जणांना घरी सोडण्यात आले म्हणजे त्यांनी कोरोनावर मात केली, तर 280 जण कोरोनिग्रस्त झाले आहेत.











