इंदापूर : महान्यूज लाईव्ह
वालचंदनगर पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या संचारबंदीच्या पेट्रोलिंग दरम्यान अनेक जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यामध्ये ती पॉझिटिव्ह आली. आज पोलिसांनी संशयित दुचाकीस्वाराला पकडून त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून दहा घातक शस्त्रे ताब्यात घेतली. पोलिसांचीही मोठी कामगिरी मानली जात आहे
वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. यामध्ये इंदापूर बारामती रस्त्यावर एक संशयित दुचाकीस्वार वालचंदनगर रस्त्यावर काहीतरी पार्सल घेऊन येत असल्याचे दिसले. त्यावरून त्यास थांबवून चौकशी केली असता व त्याच्या दुचाकीवरील साहित्याची तपासणी केली असता, त्यामध्ये 10 धारदार शस्त्रे आढळून आली.
त्यावरून शेळगाव ता. इंदापूर येथील सचिन गंधारे यास पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतले आणि त्याला अटक केली. सचिन गंधारे याच्यावर यापूर्वीदेखील काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वालचंदनगर पोलिस ठाण्यात घातक शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार, फौजदार अतुल खंदारे, पोलीस हवालदार श्री माने, श्री वायसे, श्री चितकोटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.