दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तालुक्यात आठ आणि शहरात दोन कोवीड सेंटर असूनही रूग्णांना बेड उपलब्ध होत नाही. यामुळे दौंड शिवसेनेचे नेते महेश पासलकर यांनी दौंड येथील रेल्वे रूग्णालायात कोवीड सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे मागणी केली होती. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासानने हे रेल्वे रूग्णालय कोरोना बाधीत रूग्णांना देण्यास परवानगी दिली आहे.
ही माहिती शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष महेश पासलकर यांनी दिली. दौंड तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या पाहता शासकीय रूग्णालायसह खासगी रूग्णालयात रूग्णांना बेड मिळत नसल्याची परिस्थिती आहे, अनेक रूग्णांना घरीच उपचार घ्यावे लागत आहेत.
तालुक्यात आठ कोवीड सेंटर सुरू आहेत. तर शहरात दोन कोवीड सेंटर असूनही रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यातच दौंड येथील रेल्वेचे रुग्णालय मागील काही दिवसापासून बंद आहे. हे रूग्णालाय तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांसाठी सुरू करावे यासाठी दौंड शिवसेनेचे नेते महेश पासलकर यांनी महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांना काही दिवसापुर्वी लेखी निवेदन दिले.
या निवेदनाची दखल घेत डॉ.गोऱ्हे यांनी तातडीने सोलापुर डीएमआर रेल्वे प्रशासनाची सातत्याने पाठपुरावा व चर्चा केली, याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी ( दि.23) दौंड येथील रेल्वे रूग्णालाय कोरोना बाधीत रुग्णांना उपाचारासाठी सुरू करण्यास मंजुरी दिली.
त्याबाबातचे मंजुरीचे हे पत्र रेल्वे प्रशासननाने दौंड तहसीलदार कार्यालयास दिले आहे. त्यानुसार तहसीलदार संजय पाटील आणि मंडळ अधिकारी सुनील जाधव यांनी रेल्वे रूग्णालयाचा ताबा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच याठिकाणी कोरोना बाधीत रूग्णांनावर उपाचार केले जाणार आहेत. यामुळे तालुक्यातील कोरोना बाधीत रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दौंड – पुरंदरचे उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांच्याशी चर्चा करून हे हॉस्पिटल सरकारी यंत्रणा किंवा खाजगी यंत्रणेला देण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे देखील तहसीलदार पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या खाजगी संस्था हे रूग्णालाय चालविण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील तहसीलदार पाटील यांनी केले आहे.