बारामती : महान्यूज लाईव्ह
खंडणीच्या गुन्ह्यात मागील वर्षी मंचर पोलीस ठाण्यात झालेल्या दाखल झालेल्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या माळेगाव येथील श्रीराम उर्फ बापू जगन्नाथ माने (वय 32 रा. माळेगाव तालुका बारामती) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.
पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, फौजदार शिवाजी ननावरे, पोलीस हवालदार रविराज कोकरे, अनिल काळे, अभिजीत एकशिंगे, विजय कांचन, धीरज जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
माने हा गेल्या वर्षापासून पोलिसांचा रडारवर होता. पोलीस त्याला शोधत होते. तो माळेगाव येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला आणि श्रीराम उर्फ बापू जगन्नाथ माने हा पोलिसांच्या ताब्यात आला. त्याला मंचर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले असून, पुढील तपास मंचर पोलिस करीत आहेत.