मुंबई : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आणखी एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 21 दिवसांच्या कालावधीत त्यांच्यावर तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
शरद पवार यांच्यावर 30 मार्च रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले. त्यांच्यावर एण्डोस्कोपी शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर सात दिवसांच्या विश्रांतीनंतर 12 एप्रिल रोजी पुन्हा एकदा त्यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ट्विट करुन, शरद पवारांच्या प्रकृतीची माहिती दिली. शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे’, असे ते म्हणाले.