यवत, वरवंड,पाटस, केडगाव या गावात परिस्थिती चिंताजनक
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे, आज सोमवारी ( दि १९) यवत, वरवंड, आणि स्वामी चिंचोली येथील कोवीड केअर सेंटर मध्ये संशयित रुग्णांची केलेल्या विविध तपासणीत आज प्राप्त झालेल्या अहवालात दिवसभरात ८० जण नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
यामध्ये तालुक्यातील यवत सहा, कासुर्डी दोन, सहजपूर तीन, बोरीऐंदी एक, ताम्हणवाडी एक, डाळिंब दोन, खामगाव एक, राहू एक, कोरेगाव भिवर दोन, पिलाणवाडी तीन, उंडवडी एक, केडगाव आठ, भांडगाव एक, देऊळगाव गाडा दोन, पारगाव चार, देलवडी एक, वरवंड दहा, कडेठाण एक, कानगाव एक, गार एक, हिंगणीगाडा एक, कुसेगाव तीन, पडवी सात, पाटस तेरा, कुरकुंभ एक, लिंगाळी एक, खडकी एक, बोअरवेल एक असे २८ गावात ८० नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांनी दिली