इंदापूर : महान्यूज लाईव्ह
दुधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मंगेश पाटील यांचे आज निधन झाले.
मंगेश पाटील यांना गेल्या चार ते पाच दिवसापासून अकलूज येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची चाचणी देखील पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनत गेली आणि आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
मंगेश पाटील हे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी होते. इंदापूर तालुक्यातील दुधगंगा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ धुरा सांभाळली. गंगावळण या गावातून येऊन त्यांनी इंदापूर तालुक्याच्या राजकारणावर ती छाप टाकली होती.
त्यांच्या निधनाने भारतीय जनता पक्षासह तालुक्यात देखील अनेकांना धक्का बसला. ते 55 वर्षाचे होते. त्यांना बाबा म्हणून राजकीय क्षेत्रात ओळखले जात होते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या तज्ञ संचालक पदावर येथे काही काळ कार्यरत होते.